Hon. MP Nilesh Rane and MLA. Nitesh Rane will inaugurate the LED welcome board and box cricket stadium and football stadium on Gadandi bridge.
कणकवली : नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली गडनदी पुला जवळ श्रीधर नाईक उद्यानानजीक लावण्यात आलेल्या एलईडी स्वागत बोर्ड व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साकारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्टेडियम व फुटबॉल स्टेडियम चे लोकार्पण माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात येणार आहे.
स्वागत बोर्ड चे लोकार्पण सायंकाळी ७ वाजता तर स्टेडियम चे लोकार्पण सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. कणकवली शहरातील जनतेला नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतानाच जनतेला क्रीडा, सांस्कृतिक सहविविध उपक्रमांच्या माध्यमातून सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.