रहाटेश्वर येथील काँग्रेस कार्यकर्त्यासह अनेक नागरिक भाजपामध्ये

आ. नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश

रहाटेश्वर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते दीपक भाऊ गुरव यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राहाटेश्वर गावाने आता यामुळे शतप्रतिशत भाजपाकडे वाटचाल केली आहे.आमदार नितेश राणे यांनी वास्तवामध्ये विकास कामाची गंगा उभी केली आहे. हे लक्षात घेता नितेश राणे यांचे नेतृत्व आपल्या भागाला विकासाकडे नेऊ शकते, हे लक्षात आल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या समवेत जामसंडे भटवाडी विघ्नेश्वर सूर्यकांत सावंत यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.यावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे,तालुकाध्यक्ष राजू शेट्ये, तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, अमित कदम इत्यादी उपस्थित होते.