मौलवी फुलांच्या पाण्यात थुंकला – बांद्यात तणाव, हिंदू बांधव आक्रमक

बांदा : प्रतिनिधी

फुलांच्या दुकानात फुलांवर मारण्यात येणाऱ्या पाण्यात थुंकल्याने मौलवी विरोधात बांदा शहरातील हिंदू बांधव बुधवारी सायंकाळी आक्रमक झालेत. संतप्त जमावाने दुकान चालकाला घेराओ घालत दुकान बंद करण्यास भाग पाडले. तसेच येत्या दोन दिवसात मौलवी बांदा सोडून न गेल्यास परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मौलवीने चूक मान्य करत माफी मागण्याचा प्रयत्न केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात मुस्लिम युवकाचे फुलांचे दुकान आहे. बुधवारी सकाळी शहरात जकात गोळा करताना हिंदू एकता मंचच्या दोघा कार्यकर्त्यांनी मौलानाला फुलांवर मारण्यात येणाऱ्या पाण्यात थुंकताना पाहिले. त्यानी याची कल्पना शहरातील हिंदू बांधवाना दिली.

हिंदू बांधवानी आक्रमक होत सायंकाळी या दुकानात मोठ्या संख्येने धडक दिली. दुकान चालकाला जाब विचारत मौलानाला बोलविण्याची मागणी केली. यावेळी मौलानाला कडक शब्दात जाब विचारत दोन दिवसात बांदा सोडण्याचा इशारा देण्यात आला. सदरचा मौलाना हा बिहार येथिल असल्याचे आधारकार्डवरून निष्पन्न झाले. यावेळी पोलिसांनी हस्ताक्षेप केल्याने तणाव निवळला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने जोपर्यंत पुढील कारवाई होत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिलेत