मालवण शहरातील घटना
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहारात बसस्थानक समोर एका लॅब मध्ये कामाला असलेल्या एका महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर भाजलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. कोणे हे कृत्य केले ते समजू शकले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. मालवण ग्रामीण रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती. सीसीटीव्ही फुटेज महिलेचा जबाब आदी माहिती पोलीस घेत आहेत.












