लाखो रुपये खर्चून घराची उभारणी
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहिरवली नं.१ मोहल्ला येथे वास्तव्यास असलेल्या बशिरा कासिम चौगुले यांच्या घराला लागलेल्या आगीत घर पूर्णत: भस्मसात झाले होते. त्यांचा संसार उघड्यावर पडला होता. दुबईस्थित उद्योजक व उधळे गावचे सुपुत्र बशीर हजवानी यांनी स्वखर्चाने लाखो रुपये खर्चून सर्वसोयीसुविधांनीयुक्त अद्ययावत घराची उभारणी करत उदूध्वस्त संसार पुन्हा उभा केला. बेशीर जवानी यांच्या उपस्थितीत झालेल्या गृहप्रवेशादरम्यान चौगुले कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले .
बहिरवली नं. १ मोहल्ला येथील रहिवाशी बशिरा कासिम चौगुले यांच्या पतीचे निधन झाले आहे.
२७ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. शॉर्टसर्किटनंतर झालेल्या सिलिंडर स्फोटाने काही क्षणातच त्यांच्या घराचे होत्याचे नव्हते झाले होते.
या भीषण दुर्घटनेनंतर चौगुले कुटुंबीय नातेवाईकांकडे आश्रयाला होत्या. आधीच घरची हलाखीची परिस्थिती त्यात भीषण आगीने घरही भस्मसात झाल्याने चौगुले कुटुंबियांवर डोंगर कोसळला होता, या भीषण दुर्घटनेची माहिती. बशीर दुबईस्थित उद्योजक हजवानी यांना मिळताच चौगुले कुटुंबियांना सर्वसोयींनीयुक्त घराची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्यक्षात घराचे काम देखील सुरू झाले. बशीर हजवानी उपस्थितीत चौगुले यांच्या कुटुंबियांचा नूतन घराच्या वास्तूचा गृहप्रवेश सोहळा पार पडला. हजवानी यांनी दिलेल्या दातृत्वाने चौगुले कुटुंबिय गहीवरले
या प्रवेश सोहळ्यादरम्यान बशीर हजवानी यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी माजी सभापती सिकंदर जसनाईक, सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले, रऊफ खतीब, हनिफ घनसार, बशीर हमदुले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.









