तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे यश

 

वेंगुर्ला l प्रतिनिधी : वेंगुर्ला कॅम्प मैदान येथे संपन्न झालेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा अखंडित राखत दमदार यश मिळवत जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी बाजी मारली आहे.

सतत विविध स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची विद्यार्थ्यां विविध स्तरांवर यश मिळवत असतात

नुकत्याच शासकीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत या प्रशालेच्या विद्यार्थी भूपेश पद्मनाभ वराडकर याने 17 वर्षे वयोगटातून गोळाफेक आणि थाळीफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तर 17 वर्षे वयोगट मुलीच्या गटात खुशी धनंजय गिरप हिने400 मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळाला आणि

प्राप्ती प्रदीप डिचोलकर हिने लांब उडी – प्रथम क्रमांक व उंच उडी या दोन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला या तिन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असुन

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री .दिपक बोडेकर सर यांचे यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष निवृत्त गट शिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, निलेश मांजरेकर , राधाकृष्ण मांजरेकर, सुनिल परब आणि सर्व पदाधिकारी यांनी यांनी अभिनंदन करताना त्या विजेते ठरलेले विद्यार्थ्यांचे पालकाचे ही विशेष अभिनंदन केले असुन विविध स्तरांवर या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या प्रशालेच्या क्रीडा स्पर्धेतही मिळवलेल्या यशाबद्दल विशेष कौतुक केले जात आहे.