केंद्रशाळा नाधवडे व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन
स्वप्निल कदम l वैभववाडी : तालुक्यातील केंद्रशाळा नाधवडे येथे पदवीधर शिक्षक शरद नारकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रशाला व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला. एक हरहुन्नरी व अष्टपैलू व्यक्तिमत्व शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त होत आहे नारकर गुरुजींनी शासकीय सेवेत दिलेले योगदान वाक्यानेजोगे आहे. असे मत माजी सभापती बाप्पी मांजरेकर यांनी यावेळी व्यक्त केले. प्रशालेला दिलेल्या योगदानाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी श्री नारकर म्हणाले ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे प्रशालेत काम करणे अतिशय सोपे गेले ग्रामस्थांच्या योगदानात मुळेच आमच्यासारखे शिक्षक शाळेच्या विकासासाठी झटत असतात. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले. पालकांनी यापुढे देखील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकांना योग्य ते सहकार्य व विश्वास देण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच लीना पांचाळ, उपसरपंच प्रफुल्ल कोकाटे, तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम इस्वलकर, शिक्षक तज्ञ नामदेव शेट्ये , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल पावसकर, श्रीरंग पावसकर, रोहित पावसकर, अनुजा जाधव, सारिका पाटील, रमाकांत पांचाळ, संतोष यादव, प्राची वसंत मुंडले, गणपत्ये मॅडम, साधले मॅडम, निकिता बेळणेकर, वैभवी पावसकर, आनंदराव पाटील, सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते










