नाटे गावात बिबटयाचा मुक्त संचार

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील नाटे गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

 

 

सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा बिबटया मानवी वस्तीमध्ये फिरताना आढळून आला आहे. तशी माहिती नितेश तिवरमकर यानी दिली. तर गावातील कुत्रे, मांजर यांना बिबटयाने लक्ष केले असून भक्ष्याच्या मागावर बिबटयाचा मानवी वस्तीत मुक्त संचार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबटयाच्या या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांत भितीचे वातारवण पसरले आहे. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर वनविभागाने या बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे आली आहे.