उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबुतीने करण्याचा निर्धार -सतीश मोरे
चिपळूण (प्रतिनिधी):– भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी जम्बो उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे. या कार्यकारणीच्या माध्यमातून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबुतीने करण्याचा निर्धार सतीश मोरे यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली होती. आता उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी उत्तर रत्नागिरीची कार्यकारणी जाहीर केली आहे.
यामध्ये उपाध्यक्ष श्रीराम इदाते, संतोष जैतापकर, मकरंद महदलेकर, सौ. ॲड. प्रतिज्ञा कांबळी, सौ. अपूर्वा बारगोडे, उपाध्यक्ष बळीराम मोरे, सरचिटणीस निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, चिटणीस किशोर आंब्रे, संजय सावंत, अजित थरवळ, लक्ष्मण (आप्पा) मोरे, संतोष मालप, शशांक सिनकर, श्रीम. नम्रता निमुणकर, कोषाध्यक्ष जगदीश आंब्रे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्मिता जावकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मंगेश रांगळे, किसान मोर्चा अध्यक्ष संतोष भडवळकर, सोशल मीडिया संयोजक वैभव नारकर, उद्योग आघाडी संयोजक गिरीश जोशी, व्यापार आघाडी संयोजक अतुल गोंदकर, उ.भारतीय आघाडी रवींद्रकुमार मिश्रा, ट्रान्सपोर्ट सेल सुनील वाजे, वैद्यकीय सेल संयोजक डॉ. संदीप जाधव, कायदा सेल संयोजक ऍड संतोष कुळे, सहकार सेल धनंजय यादव, सांस्कृतिक सेल गोविंद उर्फ किरण खरे, शिक्षक सेल अनंत साळवी, आयुष्यमान भारत सेल सौ. ज्योती बोरकर, पंचायत राज व ग्रामविकास सेल योगेश शिर्के, जेष्ठ कार्यकर्ता सेल लक्ष्मण शिगवण, बेटी बचाव बेटी पढावो सेल सौ. ज्योती परचुरे, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक अजय दळवी, आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ संयोजक प्रमोद सकपाळ, विशेष निमंत्रित सदस्य डॉ. विनय नातू, सुर्यकांत दळवी, केदार साठे, दत्तात्रय रेडीज, विठ्ठल भालेकर, विश्वदास लोखंडे, प्रशांत शिरगावकर, यशवंत बाईत, निलम गोंधळी, सौ. प्रिया दरीपकार, मंगेश जोशी, वसंती गोंधळी, श्रेया विनोद चाळके, अशोक भडवळकर, दीपक महाजन, अनिल चिले, खलिद परकार, सौ. दीप्ती असगोलकर, सौ. वैशाली मावळणकर, सौ. निलम जाधव, विशेष निमंत्रित सदस्य परशुराम लांबे, विशेष निमंत्रित सदस्य इक्बाल परकार, नरेश पवार, रविंद्र पवार, सुरेश शिर्के, अजय तोडकरी, दिनेश सुरेश पोफळकर, सदस्य विरसिंह (उदय) बोरकर, सौ. मनाली शिंदे, सौ. शितल भोसले, मुबीन ठाकूर, सौ. श्वेता महापदी, सौ. शुभांगी भोसले, विष्णू हरिश्चंद्र पावसे यांचा समावेश आहे. या नवीन कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, विशेष निमंत्रित सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











