इन्सुली नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी समीर गावडे

 

बांदा : प्रतिनिधी :     इन्सुली येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बैठकीत समिती नेमण्यात आली असून दरम्यानच्या काळात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.

 

समिती खजिनदारपदी विनोद गावकर तर सचिवपदी दिलीप पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. समिती सदस्य म्हणून तात्या परब, सुभाष धुरी, गोकुळदास पोपकर, सुभाष बांदिवडेकर, महेश परब, अरविंद कोटणीस, कृष्णा सावंत, अशोक सावंत यांची निवड करण्यात आली. नवरात्रोत्सव काळात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

————