जिल्हास्तरीय लोकशाही दिन 7 ऑक्टोबर रोजी

 

रत्नागिरी, : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑक्टोबर 2024 चा लोकशाही
दिन सोमवार 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.1 ते 2 वा. या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक
आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज
सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.