तालुक्यातील महिला बचत गट,जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतचा सहभाग
मोडकाआगर l वार्ताहर :जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत गुहागर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील महिला बचत गट जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत साठी टाकाऊ वस्तूंची कलाकृती स्पर्धा पंचायत समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र गळवे, ग्राम विस्तार अधिकारी शरद भांड, गुहागर तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष बाबुराव सुर्यवंशी, पत्रकार गणेश किर्वे, आबलोली सरपंच वैष्णवी नेटके, उपसरपंच अक्षय पागडे, परदेशी परीक्षक सुरेश कदम, (जामसुत हायस्कूल),गणेश कुलकर्णी (पाचेरीआगर हायस्कूल), संतोष मोहिते (गुहागर हायस्कूल) आदी मान्यवर उपस्थित होते. टाकाऊ वस्तूंची कलाकृती गुणांकनांमध्ये सर्जनशीलता आणि मौलिकता, टाकाऊ पदार्थांचा वापर, कारागिरी आणि अंमलबजावणी, पर्यावरण संदेश, सौंदर विषयक आवाहन, साहित्य वापरातील नाविन्य, वैचारिक खोली, प्रभाव आणि संप्रेषण, सादरीकरण अशा पद्धतीने गुणांकन दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये कोतळूक शाळा नं. १, ग्रामपंचायत उमराठ येथील संदेश पांडुरंग गावंणंग यांनी टाकाऊ पुठ्ठ्यातून श्री नवलाई मंदिर व बगाडा तयार केला होता, ग्रामपंचायत आबलोली यांनी बांबू पुठ्ठा व स्पंजपासून टाकाऊ वस्तु पासून कलाकृती सादर केले होते, पुठ्ठ्यांपासून बनवलेले राम मंदिर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. शाळा अंजनवेल , ग्रामपंचायत खोडदे, सद्गुरू कृपा स्वयम् सहायता समूह बचत गट खोडदे गणेश वाडी, माऊली समूह बचत गट खोडदे मोहितेवाडी, किसान महिला बचत गट खोडदे बौद्धवाडी, पोमेंडी ग्रामपंचायत, ग्रामपंचायत धोपावे तेटले, पाटपन्हाळे हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा गुहागर नंबर १, केंद्र साखरी बुद्रुक शाळा, चिखली मांडवकरवाडी शाळा नं.१
आदी सहभागी झाले होते. या सर्व शाळां, बचत गट व ग्रामपंचायत आदींनी विविध कलाकृती सादर केल्या होत्या.












