आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई शाळा, दक्षिण विभाग 2 यांच्यातर्फे कोकमठाण, कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र येथील मुले आणि मुली यांच्यासाठी दिनांक १९ ते २३ सप्टेंबर २०२४ रोजी तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत एकूण २८०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. गौरी विलणकर इयत्ता ९ वीत शिकत आहे. वयाच्या ६ व्या वर्षापासून गौरी तायक्वांदोचे धडे गिरवत आहे. तिने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. याआधी गौरीने खेलो इंडीया स्पर्धेत देखील सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. गौरीला प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि एशियन युनियन कोचचे राष्ट्रीय खेळाडू तसेच महाराष्ट्र राज्य स्वयंसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गौरीने नेहमीच राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे गौरीची उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ही स्पर्धा दिनांक ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मदर इंडिया पब्लिक स्कूल, उत्तरांखंड येथे होणार आहे. तिला पुढील वाटचालीसाठी शाळेचे संचालक श्री. दीपक गर्दे, श्री.अर्जुन गद्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका जयस्वाल, झेबा परकार, सौ.राधा करमरकर, क्रीडा शिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.











