टेंडरसाठी वैभव नाईकनी स्वतःची आमदारकी विकली

भाजपा नेते निलेश राणे यांची घणाघाती टीका

मालवण | प्रतिनिधी : टेंडर मॅनेज करून कामे देणे हेच काम उबाठा आ. वैभव नाईक यांनी केले. टेंडरसाठी वैभव नाईकनी स्वतःची आमदारकी विकली. मॅनेज स्वरूपातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दहा वर्षात मालवण कुडाळ ओसाड पडला. याचं मॅनेज विषयातून सोमवारी जिल्हा परिषदेत वैभव नाईकांनी राडा केला. टेंडर हा वैभव नाईकांचा विक पॉईंट आहे. अशी टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी यांनी केली आहे.

निलेश राणे म्हणाले, कोल्हापूर येथे मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतांना वैभव नाईक यांची ढाके या व्यक्तीशी ओळख झाली. वैभव नाईक आमदार झाल्यानंतर हे ढाके पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. टेंडर मॅनेज झाली, निकृष्ट कामे झाली. आमदार वैभव नाईक यांनी हे चालूच ठेवले.

स्वतःच्या आमदार फंडातील कामाची तक्रार करणारा आमदार अशीही ओळख त्यांनी निर्माण केली. पिंगुळी येथे स्वतः आमदार निधी दिलेल्या एका विहिरीच्या कामाची तक्रार त्यांनी केली. काही मिळाले नाही की तक्रार असा हा प्रकार. तर मालवण येथे पतन विभागाच्या एका दोन कोटीच्या जिओ ट्यूब कामात दोन ठेकादार यांच्याकडून 70 लाख उखळले. काम बोगस झाले आता त्या ठिकाणी घातलेले जीओ ट्यूब अस्तित्वातच नाहीत.

अश्या दर्जाची निकृष्ट कामे होत असतील तर कसला विकास? कसले पर्यटन? सर्व विकास कामे, ग्रामसडक सगळ्याच कामात हेच सुरु आहे. मात्र जिल्हा परिषदेतील राडा प्रकाराने हे समोर आले. रत्नागिरीतही असे प्रकार घडतात. कोणाचेही समर्थन या बाबत करणार नाही.

जनतेची एवढीच अपेक्षा असते विकास कामे व्हावीत आणि ती चांगल्या दर्जाची व्हावीत. मात्र असे घडत नाही. आ. नाईक घडू देणार नाही. ठेकेदारी संपली तर काय? आपले अस्तित्व संपेल. ही भीती त्यांना आहे. असेही निलेश राणे म्हणाले.