बांदा (प्रतिनिधी) : निगुडे येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी आरती, महाप्रसाद होईल.
गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता श्री देवी माऊलीची विधीवत पूजा व घटस्थापना कार्यक्रम होईल. रात्री ९ वाजता श्री विघ्नहर्ता दशावतार नाट्यमंडळ निगुडे यांचा ‘माता वैष्णोदेवी महिमा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवार ४ रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांची महाआरती, ९ वाजता ग्लोइंग स्टार दांडिया ग्रुप आरोंदा यांचे दांडीया नृत्य होईल. शनिवार ५ रोजी रात्री ९ वा. श्री कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा ‘अनंत चतुर्थीचा महिमा’ हा नाट्यप्रयोग होईल.
रविवार ६ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वा. स्थळकर दांडिया ग्रुप तळवडे यांचा दांडिया, रात्रौ ९ वा. शेर्ले मधील महिलांची फुगडी होईल. सोमवार ७ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ वा. श्री मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा ‘दंतेश्वरी महिमा’ हा नाट्यप्रयोग होईल. मंगळावर ८ रोजी रात्रौ ८ वा. आरोसकरटेंब संयुक्त भजन, ९ वा. महिला फुगडी होईल. बुधवार ९ रोजी रात्रौ ९ वा. निगुडे ग्रामस्थ, तेलवाडी भजने होतील.
गुरुवार १० रोजी रात्रौ ९ वा. श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळाचा ‘धृणेश्वर तीर्थ’ हा नाट्यप्रयोग होईल. शुक्रवार ११ ऑक्टोंबर रोजी रात्रौ ८ वा. महिलांचे सदाबहार कार्यक्रम व पैठणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष समीर गावडे व सचिव राजेश मयेकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.










