आज रोजी 2 ऑक्टोबर 2024 महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच, 1 ऑक्टोबर ते 7ऑक्टोबर 2024 वन्यजीव सप्ताह सुरू असल्याने मा विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग व निसर्ग सोबती सह्याद्री संकल्प सोसायटी यांचेमार्फत नेचर ट्रेल चे आयोजन मौजे पोमेंडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील देवराईत करण्यात आले होते यामध्ये निसर्ग सोबती मधील पक्षी अभ्यासक श्री विराज आठल्ये व श्री अक्षय तोंडवळकर यांनी परिसरात आढळणाऱ्या पक्षी,कीटक, मधमाशी ,झाडे , वेली , याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले व मानवासाठी निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले
सदर निसर्ग सफारीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी , रत्नागिरी श्री प्रकाश सुतार,श्री.सुचित वंजारी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी रत्नागिरी, श्री निवास यादव उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय रत्नागिरी ,वनपाल पाली श्री न्हानू गावडे ,लेखापाल श्री तानाजी पाटील ,लिपिक श्री अनिकेत चौगुले, अनिकेत कोनकर (आकाशवाणी वार्ताहर ),प्रवीण साळुंखे ,प्रभात गांगण इत्यादी सहभागी होते उपस्थित यांना श्री प्रकाश सुतार यांनी निसर्गामध्ये वन्य प्राण्यांचे महत्त्व व गरज याबाबत माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले व सर्वांना आवाहन करण्यात आले की वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यजीव व वनस्पती नष्ट होणार नाही , पाणी प्रदूषण हवा प्रदूषण होणार नाही याकडे सर्वांनी सतर्क राहून लक्ष दिले पाहिजे व वन्यजीव वनस्पती याचे संवर्धन संरक्षण केले पाहिजे असे आव्हान वन विभाग व निसर्ग सोबती सह्याद्री संकल्प सोसायटी रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात येते आहे










