वेंगुर्ले तालुक्यात शारदीय नवरात्रौत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ…

 

नऊ दिवस सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन

वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी पारंपारिक आणि पद्धतीने आज शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मातोश्री कला क्रीडा मंडळ दाभोलीनाका या मंडळाच्यावतीने पूजन केलेल्या श्री. दुर्गा मातेचे भाजपचे तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वत्र देवीचे पूजन उत्साहात पार पडले.
वेंगुर्ले शहरात मातोश्री कला क्रिडा मंडळ-दाभोली नाका, तालुका शिवसेना कार्यालय-सुंदरभाटले, कॅम्प कॉर्नर, तांबळेश्वर-भगवती मित्रमंडळ गाडीअड्डा, मठ शिवाजी चौक, दाभोली-रेवणकरवाडी, म्हापण तिठा तसेच शिरोडा येथील माऊली मंदिर येथे नवदुर्गेचे पूजन करण्यात आले.

 

 

तसेच या नऊ दिवसा मध्ये सातेरी (वेंगुर्ला), सातेरी (वेतोरे), सातेरी (मातोंड), सातेरी (दाभोली), सातेरी (खानोली), सातेरी (मठ), केपादेवी (उभादांडा), भराडी (परबवाडा), रवळनाथ, पूर्वस (वेंगुर्ला), गुणादेवी (कॅम्प), तांबळेश्वर-भगवती (गाडीअड्डा), भगवती (राजवाडा), सातेरी (आरवली) या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नऊ दिवस सर्वत्र भजन, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे .