देवधे गावात शिवसेना उबाठाला खिंडार

 

देवधे मणचेकरवाडी येथी महिला वर्गाचा भाजपात प्रवेश

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी येथे शिवसेना उबाठा गटाला धक्का बसला असून येथील असंख्य महिला वर्गाने लांजा तालुका भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला .या सर्व महिला वर्गाचे पक्षाची शाल घालून स्वागत करण्यात आले .

 

 

लांजा तालुका भाजपा कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. वर्षा प्रभूदेसाई व‌ बुथ अध्यक्ष योगेश मणचेकर यांच्या प्रयत्नातून येथील असंख्य महिलांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व महिला वर्गाचे भाजपा महिला पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले .
या पक्ष प्रवेश कार्यक्रमा प्रसंगी भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा निवडणूक प्रमुख उल्काताई विश्वासराव, महिला पदाधिकारी सौ.मराठे, लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, पदाधिकारी विजय कुरुप, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, तालुका सरचिटणीस विराज हरमले ,शैलेश खामकर तसेच जितेंद्र चव्हाण,इकबाल गिरकर, अनिल कांबळे, प्रकाश मांडवकर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.