वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा वेंगुर्ला येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये शिरोडा येथील गुरु. अ. वि. बावडेकर विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
१०० मीटर धावणे या खेळ प्रकारात प्रतीक विकास नांदोस्कर प्रथम क्रमांक पटकावला. उंच उडी या खेळ प्रकारात नैतिक सुनील नाईक प्रथम क्रमांक. लांब उडी या खेळ प्रकारात सावळाराम विष्णू नार्वेकर प्रथम तर उंच उडी त कुमारी सिद्धी दत्तगुरु परब हीने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. या चारही विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या चारही स्पर्धकांना क्रीडा शिक्षक राजू चव्हाण तसेच आडेलकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व स्पर्धकांचे हायस्कूलचे मुख्याध्यापक के.डी. पोवार सर, पर्यवेक्षक श्री मंगेश कांबळीसर, संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











