वायंगणी माळरानावतील सीमेवर खड्यात पुरलेल्या मृतदेहा मुळे खळबळ..

वेंगुर्ले : दाजी नाईक
वायंगणी माळरानावतील सीमेवर एक मृतदेह कुणीतरी अज्ञातांनी खड्डा खोदून पुरला अशी माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी टीमसह घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता सदर ठिकाणी खड्डा खणून पुरलेल्या खुणा दिसून आल्या मात्र तो खड्डा पोलिसांनी उखरून पाहिले असता त्या खड्यात मेलेला बकरा पुरलेला आढळून आला. त्यामुळे निश्र्वास सुटला.पण त्या बाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
सोमवारी दुपारी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दूरध्वनीवर एका नागरिकाने वायंगणी माळरानावर कुणी तरी अज्ञातांनी खड्डा करून मृतदेह पुरला अशी माहिती दिली. या माहितीवरून वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी काही वेळापूर्वी एक खड्डा खोदून त्यात काहीतरी पुरून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तो खड्डा खोदून पाहिले तर खड्ड्यामध्ये मृतदेह होता. पण तो बकऱ्याचा. परिसरातील एकाने आपल्याकडील मेलेला बकरा पुरला असल्याचे समोर आले आहे. मात्र यामागे नेमके काय देव-देवसकी तर नाही ना. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.