कणकवली : ओटव बौद्धवाडी येथील प्रमोद काळू तांबे (वय ५४) यांचा कीटकनाशक प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजेश शंकर तांबे यांनी खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद तांबे यांनी दि. १ मार्च २०२६ रोजी युरिया प्रकारचे कीटकनाशक औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने २ मार्च रोजी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.












