माणी शिंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाडा ठार

खेड (प्रतिनिधी)
खेड तालुक्यामध्ये माणी शिंदेवाडी कुळवंडी शिंदेवाडी भागामध्ये बिबट्या वाघाचा मुक्त संचार चारच दिवसांपूर्वी संकेत शिंदे या शेतकऱ्याच्या चार बकऱ्या बिबट्या वाघाने फस्त केल्या होत्या त्या नंतर  ६ ऑक्टोबर   रोजी संध्याकाळची पाचच्या सुमारास राजेश बावदाने या तरुण शेतकऱ्याच्या गाईचा पाडा माने शिंदेवाडी येथे बिबट्या वाघाने फस्त केला
 पशुधन गोपालन या व्यवसायाचे जीवावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यावर यामुळे आर्थिक संकट ओढवलेले आहे  वन विभागाने तातडीने पिंजरा लावून  वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.