खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील कळंबणी-मालवाडी, हंबीरवाडीसह सोंडे-बौद्धवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांसह महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
कळंबणीतील प्रवेशकर्त्यांमध्ये जना जोंधळे, शालिनी घाणेकर, राजश्री हंबीर, लक्ष्मी भुवड, संजना शिंदे, लक्ष्मी शिंदे, प्रतिभा हंबीर, शेवंती हंबीर, रुपाली कावरे, शोभावंती हंबीर, प्रतीक्षा राणे, सुनिता राणे, रविना शिगवण, रुक्मिणी हंबीर, ज्योती हंबीर, मनिषा हंबीर, अश्विनी हंबीर, प्रकाश हंबीर, विजय भुवड, सचिन हंबीर, बाबू घाणेकर, संदीप हंबीर, दिनानाथ फावरे, प्रसाद हंबीर, अनंत निकम, साहिल शिंदे, मयूर हंबीर, सनी हंबीर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सोंडे-बौद्धवाडी येथील संदीप गमरे, सरिता गमरे, साहिल गमरे, स्वप्ना गमरे, शैला गमरे, प्रदिप गमरे, शारदा गमरे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी जि. प. सदस्य अरुण कदम, उद्योजक शैलेश कदम, तालुका संघटक महेंद्र भोसले, शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.











