वाटद खंडाळा येथून तरुण बेपत्ता 

 

खंडाळा l वार्ताहर = रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील तरुण बेपत्ता झाल्याची खबर जयगड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. बेपत्ता तरुण राकेश अशोक जंगम राहणार वाटद खंडाळा कोकण नगर वय वर्ष 27 असे नाव आहे. 6 जून 2024 रोजी रात्री अकरा वाजता राकेश जंगम घरातून कोणालाही न सांगता घराबाहेर पडला आहे.

 

 

 

तो घरी परतला नसल्याने त्याची आई वंदना अशोक जंगम यांनी 21/06/2024 रोजी जयगड पोलिस ठाणे येथे खबर दाखल केली. राकेशची उंची पाच फूट सहा इंच असून रंग सावळा आहे,उभट चेहरा,, वाढलेले केस, दाढी, पाया चॉकलेटी रंगाचे बूट, निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, सोबत काळ्या रंगाची बॅग असे त्याचे वर्णन आहे. हा तरुण कोणाला आढळल्या जयगड सागर पोलीस ठाणे येथे कळवावे असे आव्हान करण्यात आले आहे.