दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे शक्ती तुऱ्याचा जंगी सामना 

 

गावखडी/वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.

दि.10 ऑक्टोबर रोजी स.10वा. होमहवन, कुवारी पुजन, रात्री 9.30वा.दांडिया रास

दि.11ऑक्टोबर रोजी दु.1वा.महाप्रसाद, रात्री 10वा.बक्षीस वितरण समारंभ, रात्री 11वा.शक्ती तुऱ्याचा जंगी सामना बुवा श्री जगन्नाथ खारगांवकर, तुरेवाले रायगड × तेजल पवार शक्ती वाले खालगाव रत्नागिरी.

दि.12 ऑक्टोबर रोजी सांय.5.30 वा.मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम, सांय.7.वा.आरती ,रात्री 9.30वा.दांडिया रास.

दि13 ऑक्टोबर रोजी दु.3.30वा.आरती- गाऱ्हाणे, दु.4वा.देवीची विसर्जन मिरवणूक, रात्री 7.30वा.आरती.

या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्षा सौ .निहा आनंद साळवी यांनी केले आहे.