टपाल डे निमित्त पोस्टमन आगळा वेगळा उपक्रम
कणकवली :मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कणकवली पोस्ट कार्यालयांमध्ये जागतिक टपाल डे निमित्त पोस्टमन यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा दिवाकर मुरकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा विजय वळंजू , कणकवली पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर गिरीश कामत, सहायक पोस्टमास्तर अशोक गावडे, शैक्षणिक मंडळाचे चेअरमन अच्युतराव वणवे, मंडळाचे सहसचिव प्रा विजय सावंत, जेष्ठ सदस्य निवृत्त माजी मुख्याध्यापक विजय पारकर पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिवाकर मुरकर, प्रमुख पाहुणे विजय वळंजू पोस्टमास्तर गिरीश कामत यांच्या हस्ते अजय लाड, नितेश सुतार, वैभव राणे, केशव पांचाळ, प्रथमेश राणे, संतोष सावंत,सौ. गार्गी शिवलकर,सौ. नम्रता मुणगेकर या सर्व पोस्टमन यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय वळंजू म्हणाले,आज जागतिक टपाल डे निमित्त या ट्रस्ट ने पोस्टमन यांचा सत्कार सन्मान केला याचे समाधान वाटले, कारण तुम्ही जनतेचे साठी काम म्हणून न करता एक प्रकारची सेवा करता याची दखल ट्रस्ट ने घेतली आणि पोस्टमन यांचा सन्मान केला हा ट्रस्ट चा आदर्श उपक्रम राबवला.
अध्यक्ष समारोप करताना मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा दिवाकर मुरकर यांनी ट्रस्ट च्या उपक्रमाचा आढावा घेऊन जागतिक टपाल डे निमित्त पोस्टमन यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली याचा विशेष आनंद होत आहे असे प्रतिपादन केले. व यांच्या सेवाभावी कार्याला सलाम करतो असे नम्रपणे नमूद केले. पोस्टमन यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांचा पाठीवर थाप मारून त्यांना अजून प्रोत्साहित होवून काम करण्याची उमेद येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक शैक्षणिक मंडळाचे चेअरमन अच्युतराव वणवे सर तर आभार सहसचिव प्रा विजय सावंत यांनी मानले.









