आंबोली व चौकुळ येथील जमीनीची मोजणी सुरु : प्रशासनाचे पत्र

एकीकडे गेळे गावातील जमिनीचे वाटप सुरू झालेले असताना आंबोली व चौकुळ जमीनीची मोजणी देखील सुरू करण्यात आली असून त्याबाबतच पत्र दोन्ही गावांतील काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.