खेड(प्रतिनिधी) खेड तालुका ट्रॅक्टर मालक संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच गणेश मंगल कार्यालय भरणे येथे पार पडली. या सभेमध्ये ट्रॅक्टर मालक संघटनेचे नवीन सभासद करुन नियुक्त कार्यकारणी जाहीर 1 करण्यात आली. यामध्ये सुकिवली गावचे उपसरपंच बळीराम निकम यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी परेश जाधव – उपाध्यक्ष, आरिफ काणेकर उपाध्यक्ष, प्रकाश धुमाळ- सचिव, दिपक निकम सहसचिव, सुरज निकम – खजिनदार, तर सदस्यपदी पांडूरंग महागावकर, हेमंत साळुंखे, गजानन वंडकर, संदीप पाटणे, प्रणय ननावरे, सल्लागार विलास यादव, प्रफुल्ल चाळके, पचिन कदम, सुजित भुवड यांची निवड करण्यात आली.










