किल्ले रसाळगड सेवा समितीतर्फे ६ रोजी स्वच्छता मोहीम

 

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील रसाळगड, सुमारगड, महिपतगड गडावर ६ ऑक्टोबर रोजी किल्ले रसाळगड सेवा समितीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता मोहिमेस प्रारंभ होईल. या तीनही गडांवर प्रत्येक महिन्यात मोहीम राबवून गडाचे पावित्र्य व गडसंवर्धन जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या मोहिमेंतर्गत तीनही गडाभोवतीचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे. या मोहिमेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रामचंद्र आखाडे, संभाजी सणस, मनोहर पवार यांनी केले आहे.