बिळवस श्री देवी सातेरी – जल मंदिर कलश वर्धापन दिन ७ मे रोजी!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे गावची मुळमाया आदिदेवता आदीशक्ती बिळवस येथील श्री देवी सातेरी देवालय जल मंदिराच्या गाभाऱ्यावरील कलश वर्धापन दिन सोहळा ७ मे २०२३ रोजी संपन्न होत आहे.
सकाळी ८ ते ९ गणेश पुजन व पुरोहितांच्या मंत्रघोषात कलश पुजन , ९ ते ११ – धार्मिक विधी,
११ ते १ श्री चिंतामणी निर्मित “मी मराठी” प्रस्तुत “स्वरधारा” – सुगम संगित मैफिल – निर्माता श्री. बाळा कांबळी,
दुपारी १ ते ३ महाप्रसाद,
३ ते ५ – श्री सत्यनारायणाची महापुजा, ५ ते ७ महाआरती, प्रार्थना, तिर्थप्रसाद – ७ ते १० – स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने, रात्रौ ठिक १०.०० वा. नाईक मोचेमाडकर, मोचेमाड-वेंगुर्ला यांचा महान पौराणिक दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
उपस्थीतीचे आवाहन
बिळवस ग्रामस्थ व सातेरी देवी जलमंदिर ट्रस्ट बिळवस यांनी केले आहे