रत्नागिरी | प्रतिनिधी : बेनी नदीवरील पूल मंजूर होऊन तो पूर्ण व्हावा यासाठी कोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आबा सुर्वे हे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार लांजा- झापडे- कांटे- कोट मार्गे पावस रस्त्यावरील बेनी नदीवरील पूल व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी खासदार, स्थानिक आमदार, प्रशासन यांच्याकडे मागणी केली आहे.
मात्र आता आबा सुर्वे हे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत.
हा पूल त्वरित मंजूर करावा यासाठी आणि पूल तात्काळ व्हावा. हार्दिक पूल लांजा तालुक्यातील पश्चिम विभागातील सर्वांच्याच फायद्याच्या असून या पुलामुळे बाराही महिने दळणवळणाची सोय होणार आहे, त्यामुळे या ची दखल घ्यावी असे शांताराम उर्फ आणा सुर्वे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.












