कुवे येथील जाकडी नृत्य स्पर्धेत विठ्ठल रखुमाई नाच मंडळ गवाणे गवळीवाडी प्रथम

कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजाचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुवे येथे पार पडलेल्या जाकडी नृत्य स्पर्धेत विठ्ठल रखुमाई नाच मंडळ गवाणे गवळीवाडीने प्रथम क्रमांक पटकावला.
कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजाच्या (कार्यक्षेत्र लांजा राजापूर रत्नागिरी) वतीने ४० वर्षावरील भव्य जाकडी नृत्य स्पर्धा रासाई देवी मंदिर कुवे येथे उत्साहात पार पडल्या. जुनी पारंपारिक लोककला जाकडी नृत्य सादर करण्याची संधी या निमित्ताने ज्येष्ठ कलाकारांना मंडळाने उपलब्ध करून दिली होती.
स्पर्धेचे उद्घाटन कलगी तुरा उन्नती समाज मंडळ समन्वय समिती अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे, मोहन घडशी, कुवे गावचे सर्व गावकरी व मानकरी, कलगीतुरा उन्नती समाज मंडळ अध्यक्ष चंद्रकांत पालकर, उपाध्यक्ष विष्णू धाडवे, सचिव रविंद्र कोटकर, सहसचिव चंद्रकांत गुरव, खजिनदार संदीप सावंत, सदस्य देवजी हरमले, दिलीप आग्रे, संदीप सोबण, शशिकांत कानागळ,कु. अमोल शिंदे तसेच सल्लागार समिती सदस्य आत्माराम धुमक, सुभाष रामाणे, चंद्रकांत जड्यार, मारुती गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

या स्पर्धेमध्ये 15 नाच मंडळांनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विठ्ठल रखुमाई नाच मंडळ गवाणे गवळीवाडी यांना रोख रक्कम ७०००/-रुपये, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक विभागून बनदेवी नाच मंडळ गवाणे रामाणेवाडी व नवयुग सेवा नाच मंडळ आसगे मांडवकरवाडी यांना रोख रक्कम ५०००/-रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक सत्यनारायण उत्साही नाच मंडळ कुवे मधली उगवतवाडी यांना रोख रक्कम ३०००/-रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ जांगलदेव नाच मंडळ ओणी कोंडवाडी यांना रोख रक्कम २०००/- रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट संच नूतन कला जाकडी नृत्य मंडळ लांजा आगरवाडी, उत्कृष्ट गायक शाहीर श्री. रवींद्र गोपाळ नामये जाकादेवी नाच मंडळ जावडे नामयेवाडी, उत्कृष्ट ढोलकी वादक श्री. विजय बापू नेमण रासाई उत्कर्ष नाच मंडळ कुवे मावतवाडी यांना प्रत्येकी रोख रक्कम ५००/-रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वरील स्पर्धेसाठी कुवे गावचे गावकरी, ग्रामस्थ तसेच सर्व मंडळाचे शाहीर, कलाकार यांचे चांगले सहकार्य लाभले.