भाजपचे खासकीलवाडा बुथ अध्यक्ष महेश आराबेकर यांचे निधन 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील बूथ अध्यक्ष महेश मनोहर आराबेकर (५८) यांचे गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास निधन झाले. गणेश मूर्तीकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मूलगा, दोन मुली, बहिणी, चुलत भाऊ , बहिणी असा परिवार आहे. सावंतवाडी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका वैशाली पटेकर यांचे चुलत भाऊ होत.