गावखडी /वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत माजी राष्ट्रपती स्व. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभीस डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार बालसभा अध्यक्ष श्रावणी कुरतडकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.याप्रसंगी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुभाष काटकर सर, विषय शिक्षिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर , छात्र अध्यापक शुभम पेटकर ,अंगणवाडी सेविका सौ.सुनिता मेस्त्री आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री.सुभाष काटकर , विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर यांनी माजी राष्ट्रपती स्व. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने पुस्तकांचे वाचन करण्याच्या उद्देशाने शालेय ग्रंथालयातील पुस्तके मुलांना देण्यात आली .आणि विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन वाचन प्रेरणादिना निमित्त केले.
त्याचप्रमाणे शाळेत वाचन प्रेरणादिन त्यानिमित्त गट क्रमांक एक इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी विषय = माझा आवडता लेखक, पर्यावरण संरक्षण नवी जबाबदारी , डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम- एक प्रेरणा
शब्द मर्यादा तिनशे
गट क्रमांक दोन
इयत्ता सहावी ते सातवी
विषय – स्वच्छ भारत अभियान एक नवी दिशा , मुलगी वाचवा मुलगी शिकवा एक नवा विचार, माझा आवडता विषय मराठी
आदि विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
शेवटी उपशिक्षिका सौ.संजया पावसकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.












