परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित, प्राथमिक शाळा पोफळी येथे भोंडला कार्यक्रम तसेच पानाफुलांची रांगोळी(भोंडला) स्पर्धा उत्साहात पार पडली. नवरात्रनिमित्त प्रशालेत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची भोंडला स्पर्धा घेण्यात आली.सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर व आकर्षक भोंडला काढला होता.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या वेळी महाभोंडला काढण्यात आला.या कार्यक्रमासाठी शिक्षक पालक संघ उपाध्यक्षा सौ.थोरवडे, सदस्या सौ.कुडाळकर सौ.शिर्के सौ.गुळवे या उपस्थित होत्या. या सर्वांच्या हस्ते भोंडला पूजन करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भोंडल्याभोवती फेर धरला. शिक्षिका सौ.प्रतिभा धुमाळ यांनी विद्यार्थिनींकडून पारंपारिक गाणी म्हणून घेतली.या नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ शिक्षिका सौ.शिवानी शिंदे,सौ.प्रतिभा धुमाळ,सौ.साधना गायकवाड,सौ.मनिषा नाईक,सौ.अक्षता साळवी तसेच श्रीम.सरिता मानकर यांनी केले.












