बॅडमिंटनच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेत 130 खेळाडू सहभागी

रत्नागिरी ः जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनमार्फत आयोजित जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकारिता रायसोनी स्पोर्ट्स फाऊंडेशन यांनी साह्य केले होते. यासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी प्रयत्न केले होते. रत्नागिरी जिल्हा असोसिएशनमार्फत रायसोनी फॉउंडेशन आणि अरुण लखानी यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच उत्तम दर्जेदार बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध केल्याबद्दल सर्वंकश विद्यामंदिरचेही आभार मानण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे 130 खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा सर्वंकश विद्यामंदिर येथील बॅडमिंटन संकुलात आयोजित केली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष ओंकार हजारे, वस्तू व सेवा कर कमिशनर विकास पोवार, अमित मुळ्ये, सरोज सावंत, राजेश आराध्यमठ, मंगेश प्रभुदेसाई, रजनीश महागावकर, विनीत पाटील, सुधीर बाष्टे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतून रत्नागिरी जिल्हा संघांची निवड करण्यात येणार आहे. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, चषक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (वियजी, उपविजयी)ः ४० वर्षांवरील दुहेरी निशिकांत मेहंदळे-संदेश कलगुटकर (विजयी) विरूध्द दिनेश जैन-निनाद लुब्री. १९ वर्षांखालिल मुली ः नेहा मुळ्ये, आर्या यशवंतराव, मुलगे ः यश भोंगले, स्वयंम पानवलकर. १७ वर्षांखालिल मुली ः नेहा मुळ्ये, आर्या यशवंतराव. मुलगे ः यश भोंगले, सुमेध सुर्वे. १५ वर्षांखालिल मुली ः वल्लरी देवस्थळी, रिया पेढांबकर. मुलगे ः अंश ढेकणे, पार्थ आपटे. १३ वर्षांखालिल मुली ः वल्लरी देवस्थळी, विश्वास गमरे. मुलगे ः आदित्य घाणेकर, अनय भोजने. ११ वर्षांखालिल मुली ः वल्लरी देवस्थळी, स्वरा खेडकेर. मुलगे ः लवीन चोचे, अभिराज पवार. पुरूष दुहेरी ः रोमित कलगुटकर-रूद्रा सदावर्ते, सिध्देश फणसेकर-यश सावर्डेकर. महिला एकेरी ः नेहा मुळ्ये, ऐश्वर्या मोहिते. पुरूष एकेरी ः यश भोंगले, सिध्दार्थ मोहिते.