२०२३-२४ या लायनेस्टिक वर्षा करता लायन्स इंटरनॅशनल च्या प्रांत ३२३४ ड१ मधील कोकण विभागातील उपविभाग ३ च्या उपविभागीय प्रमुख लायन श्रेया केळकर यांना लायन्स इंटरनॅशनल च्या झोन चेअरमन या विभागातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला…. लायन्स इंटरनॅशनल घ्या प्रथेनुसार वर्षभर केलेल्या कामाचे योग्य ते निरीक्षण करून लायन्स इंटरनॅशनल तर्फे दिला जाणारा Zone chairman’s excellence award हा पुरस्कार पुढील वर्षात घोषित केला जातो…..त्याप्रमाणे या वर्षात तो घोषित करण्यात आला व कोकण विभागीय परिषदेत माननीय प्रांतपाल लायन ॲड.एम.के.पाटिल यांच्या हस्ते तो श्रेया यांना प्रदान करण्यात आला…
उपविभागीय प्रमुख म्हणून काम करत असताना कोकण विभाग, लायन्स प्रांत ३२३४ड१,तसेच बहुप्रांत ३२३४ अशा विविध स्तरांवर त्यांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले होते…..लायन श्रेया यांच्या उपविभागात लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, लायन्स क्लब ऑफ संगमेश्वर, लायन्स क्लब ऑफ देवरूख, लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल,व लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरी या पाच क्लब्स चा समावेश होता..या पाचही क्लब च्या कार्यक्षम अध्यक्ष सचिव खजिनदार व क्लब चे सर्व जेष्ठ श्रेष्ठ सदस्य यांच्या सहकार्याने वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले…लायन श्रेया यांनी 30 परिपत्रके,नवीन सदस्य वृद्धी,नवीन लिओ क्लब ची स्थापना,प्रांतातील सर्व कार्यक्रमांना उपस्थिती, सर्व क्लब ना प्रत्येक महिन्यात मार्गदर्शन,तीन झोन ॲडव्हायझरी मिटींग चे आयोजन,”सिद्धश्री” या झोन सोशल ॲवॉर्ड नाईट चे आयोजन श्रेया यांनी केले.पाच क्लब ची मिळून एकत्र सेवाकार्य, ऑनलाइन पद्धतीने वेबिनार, ट्रेनिंग चे आयोजन करताना लायन्स इंटरनॅशनल कडून दिलेल्या ज्या काही जबाबदाऱ्या झोन चेअरपर्सन म्हणून पार पाडायच्या असतात त्या सर्व लायन श्रेया यांनी पार पाडल्या… त्यांच्या नेतृत्वाखाली पाच क्लब नी मिळून लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशन ला जास्तीत जास्त देणगी दिली… संपूर्ण प्रांतात जास्तीत जास्त ही देणगी देणारा तसेच बाराही महिने सर्व सेवाकार्य व प्रशासकीय कार्याचे वेळेत रिपोर्ट सादर करणारा उपविभाग हा लायन श्रेया यांचा होता….. मुंबई येथे झालेल्या गिव्ह कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात सुद्धा श्रेया यांची उपस्थिती होती ज्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय अध्यक्षा,माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच विविध देशांतील तसेच भारतातील लायन्स सदस्यांचा सहभाग होता…… त्यांच्या विभागातून सात फाईल्स ना प्रांतात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले व पुढे बहुप्रांतात प्रतिनिधित्व करण्यासाठी या फाईल्स पात्र झाल्या….आणि तिथेही सर्व फाईल्स ना पुरस्कार प्राप्त झाले… उपविभागातील पाचही क्लब हे प्रांतात टॉप १० मध्ये सुद्धा होते.हे सर्व कार्य करताना होम क्लब चे म्हणजेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चे विशेष मोलाचे सहकार्य व योगदान मिळाल्याचे श्रेया यांनी सांगितले व त्यासाठी त्यांनी त्यावेळच्या अध्यक्षा लायन शिल्पा पानवलकर सचिव लायन संजय पटवर्धन खजिनदार लायन श्रद्धा कुळकर्णी व त्यांच्या संपूर्ण टिमचे मनःपूर्वक आभार सुद्धा मानले..त्याच प्रमाणे इतरही चार क्लबचे अध्यक्ष लायन महेश उपळेकर,लायन चेतन पाडाळकर,लायन दर्शन पवार व लायन मनोजकुमार खानविलकर आणि त्यांच्या संपूर्ण टिम्सचे आभार मानले.
या पुरस्काराचे सर्व श्रेय त्यांनी पाचही क्लब च्या अध्यक्ष सचिव खजिनदार व त्यांच्या संपूर्ण टिमला तसेच वर्षभर मार्गदर्शन करणाऱ्या माजी झोन चेअरमन,माजी प्रांतपाल,व प्रांतीय अधिकारी तसेच कुटुंबीय यांना दिल्याचे लायन श्रेया यांनी सांगितले…












