स्टार कट्टा महिला ग्रुपचे वतीने घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान

On behalf of Star Katta Mahila Group, honoring the women who work as housewives

मंडणगड | प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनाचे औचीत्यसाधून शहरातील केशव शेठ लेंडे नगरातील स्टार कट्यावरील महिलांनी नगरात घरकाम करणाऱ्या महिलांना साडी व अल्पोपहार देऊन सन्मानित केले. 1 मे हा दिवस सर्वत्र कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. शहरात घरकामाची सेवा देणाऱ्या महिला त्या काम करीत असलेल्या घरामधील सदस्य बनुन जातात नेहमीच्या जीवनात त्यांचा योगदानाला सन्मान मिळावा या उद्देशाने समाजकार्यात नेहमी पुढे असणाऱ्या स्टार कट्यावरील महिलांनी आपल्या नगरात काम करणाऱ्या चार महिलांचा यथोचीत सन्मान केला नगरातील गणेश मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास सौ. चारुलता पारेख, सौ. योजना शेट्ये, सौ. सारिका मेहता, सौ सौ. ज्योती लेंडे, सौ. पारुल जैन, सौ. गिता लेंडे, सौ. पटेल भाभी, सौ. संगीता धामणस्कर व महिला सदस्या उपस्थित होत्या.