कट्टा येथे छ.शिवरायांना पत्र या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 19 ऑक्टोबर रोजी!

मसुरे | झुंजार पेडणेकर : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्या रौप्य महोत्सवी वर्ष शुभारंभ निमित्त 19 ऑक्टोबर 2024 ते 19 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवरायांना पत्र या ऑनलाईन स्पर्धेचा बक्षीस समारंभ केंद्रशाळा कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कॉम्रेड प्राचार्य आनंद मेणसे, साहित्यिक अजय कांडर, नाथ पै सेवांगण मालवण अध्यक्ष एड. देवदत्त परुळेकर उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष बापू तळावडेकर, कार्याध्यक्ष श्याम पावसकर, कार्यवाह वैष्णवी लाड यांनी केले आहे