भाजप युवामोर्चा कणकवली शहराध्यक्ष पदी सागर राणे यांची फेरनिवड

Screenshot

 

कणकवली/ प्रतिनिधी; ओरोस जिल्हा भाजप कार्यालय येथे युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कणकवली शहराध्यक्ष पदी सागर राणे यांची फेरनिवड करण्यात आली. ही निवड युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, कणकवली तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, अण्णा खाडये व युवामोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीसाठी संदीप मेस्त्री यांनी सागर राणे यांचे अभिनंदन केले.