खेड तिसंगी बसला अपघात २० प्रवाशी बचावले

खेड | प्रतिनिधी : 
खेड खोपी मार्गावर तिसंगी गीते वाडी नजीक खेड बस स्थानका तुन दुपारच्या सुमारास सुटलेली खेड तिसंगी बस रस्त्याच्या कडेला कलडुन अपघात झाल्याची घटना गुरुवारी घडली या अपघातात बस मधील २० प्रवाशी सुदैवाने बचावले
येथील स्थानकातून सुटलेली खेड तिसंगी बस तिसंगी गीतेवाडी नजीक आली असता चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस रस्ता सोडून गटारात कलंडली या मध्ये बस मध्ये २० प्रवाशी होते त्यांना मात्र कोणतीही दुखापत झाली नाही.