खेड येथे पकडला अवैध विदेशी मद्य साठा

Illegal stock of foreign liquor seized at Khed

गाडीसह तब्बल 47 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

रत्नागिरी | प्रतिनिधी : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी व गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून खवटी गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर हॉटेल सृष्टी धाबा समोर सापळा रचला असता दि. ०२/०५/२०२३ रोजी संध्याकाळी १६.१५ वा. चे सुमारास गोवाहुन मुंबईच्या दिशेने येणा-या वाहनांची कसून तपासणी करीत असताना एक संशयित पांढ-या रंगाचा टाटा ११०९. MH-04-GF-9301 तपासणीसाठी थांबवुन सदर वाहन तपासणी केली. त्यावेळी चालकाच्या मागील बाजुस हौदया मध्ये सु. ७५० मी.लि. मापाचे एमपीरीयल ब्लु विदेशी मद्यचे एकुण ५० बॉक्स सु. ७५० मी.लि. मापाचे रॉयल चॅलेंज विदेशी मद्यचे एकुण १०० बॉक्स तसेच ७५० मी.लि. मापाचे ऑल सीझन विदेशी मचे एकुण ५० बॉक्स सु. १८० मी. लि. मापाचे एमपीरीयल ब्लु विदेशी मद्यचे एकुण २५० बॉक्स व १८० मी. लि. मापाचे रॉयल चॅलेंज विदेशी मद्यचे एकुण ५० बॉक्स असे एकुण ५०० बॉक्स मिळुन आले. असे एकुण ४३९२ ब.लि. विदेशी मद्याचा साठा मिळुन आला. असे एकुण गाडी सहीत मुद्देमालाची किंमत रू. ४७,७३,०००/- एवढया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन सदर मुद्देमाल वाहतुक करणारा ट्रक चालक प्रेमकुमार जेठाराम थोरी रा. जेठाराम थोरी लालेकी बेरी बाँड, बारनेर राजस्थान यास चौकशीसाठी ताब्यात घेवुन त्याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे निरीक्षक श्री. सुनिल आरडेकर, दुय्यम निरीक्षक श्री. महादेव आगळे, तसेच जवान श्री अनुराग बर्वे, जवान नि वाहन चालक अतुल वसावे तसेच भरारी पथक सातारा चे जवान अमोल खरात यांनी भाग घेतला. तसेच श्री. गणपत जाधव व श्री. विजय सावंत यांनी सदर कारवाईकामी मदत केली. वरील गुन्हयांचा पुढिल तपास निरीक्षक श्री. सुनिल आरडेकर करीत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सुर्यवंशी व संचालक सुनिल चव्हाण यांचे आदेशान्वये तसेच बी. एच. तडवी विभागीय उपआयुक्त कोल्हापुर विभाग व रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर व प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली दि. ०२/०५/२०२३ पासुन राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन ठिकठिकाणी तपासणी नाके गस्ती मोहिम राबविण्यात आली आहे. त्यातील हा कारवाईचा भाग आहे.