फोंडाघाट कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन 

हरकुळ खुर्द बीज प्रकियेचे कृषिदूतांतर्फे प्रात्यक्षिक

तळेरे : ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ संचालित राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदूतांनी हरकुळ खुर्द येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया आवश्यक असल्याची माहिती कृषिदूतांनी दिली. विषय शिक्षिका प्रा. निकिता लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत योगेश दंताळ,ऋतुराज सावंत, दुर्वेश रावराणे, नमित आचरेकर, सौरभ पुजारी, हर्ष शेट्ये, सोमनाथ वेटे, मोहनिश देसाई, दिपक वाडेकर
विनायक मोडक