The work of Talwade Tourism Festival for conservation of traditional folk art is commendable
लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांचे गौरवोद्गार
सावंतवाडी । प्रतिनिधी : तळवडे येथील कै. प्रकाश परब मित्र मंडळ, सर्व सेवाभावी संस्था आणि तळवडे ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित तळवडे पर्यटन महोत्सव नुकताच संपन्न झाला. या महोत्सवात पारंपारिक राधा कृष्ण नृत्य स्पर्धेसह शिमगोत्सव स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी या शिमगोत्सवातील पारंपरिक राधा नृत्य स्पर्ध चे परिक्षण लोककलेचे अभ्यासक आणि सुप्रसिद्ध निवेदक, महाराष्ट्राचे युवा व्याख्याते, उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित असलेले प्रा.वैभव खानोलकर यांनी केले. आपल्या परिक्षक मनोगतात पारंपरिक लोककला संवर्धनासाठी तळवडे पर्यटन महोत्सवाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढत या लोककला संवर्धनासाठी तळवडे ग्रामस्थचे व आयोजकांचे जाहीर आभार मानले. लोककला जपण्यासाठी लोककलावंताना व्यासपीठ देणं गरजेचं असते आणि ते कार्य आज या पर्यटन महोत्सवात केले गेले तो हा या मातीचा आणि लोककला कलावंताचा गौरव आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त करत या मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या नियोजनाचे ही कौतुक केले.
या स्पर्धेत दुसरे परिक्षक म्हणून नेरूर गावचे सुपुत्र आणि एक कला प्रेमी अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असणारे सौरभ पाटकर यांनी काम पाहिले. या पारंपरिक शिमगोत्सवात नेरूर गावच्या लक्षवेधी चलचित्रानी कार्यक्रम रंगत आणली आणि विविध ठिकाणी असलेल्या आपल्या पारंपरिक राधा-नृत्य, विविध गावची पारंपरिक नृत्य हि या स्पर्धेतील लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे नेरूर गावच्या राधा कृष्ण मारूती शंकासुर आदी वैविध्यता पुर्ण असणारे नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.दशावतार लोककला बरोबर इतर लोककला या जिल्ह्यात जपल्या जातात आणि त्याचे दर्शन या पर्यटन महोत्सवात दिसले. या लोकोत्सव महोत्सवाला रसिकांचा ही अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले.











