वेंगुर्ले : दाजी नाईक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आज वेंगुर्ले शहरात पथ संचलन करण्यात आले. शहरात मुख्य ठिकाणी पोलिसांनी संचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या उपस्थितीत शिरोडा नाका – लकी स्टोअर -चार गदा मारुती मंदिर – वेंगुर्ला बाजारपेठ – दाभोली नाका – व परत शिरोडा नाका असे पथ संचलन (रूट मार्च)करण्यात आले. सदर रूट मार्च करिता ६ पोलीस अधिकारी ३२ पोलीस अंमलदार व सीआयएसएफ चे २५ जवान सहभागी झाले होते.












