बांदा (Banda) | प्रतिनिधी:
माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. “निलेश साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. महायुतीच्या (Mahayuti) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
याप्रसंगी, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब (Former Municipal Chairman, Sawantwadi), भाजप (BJP) युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री (District President), बांदा माजी उपसरपंच जावेद खतीब (Former Deputy Sarpanch), माजी जि.प. अध्यक्ष अशोक सावंत (Former ZP President), कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे (Former Municipal Chairman, Kudal), आनंद शिरवलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब (District Bank Director), शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे (Taluka Chief, Shiv Sena), विभागप्रमुख राजेश विर्नोडकर (Regional Head), आणि बांदा युवा सेना विभाग प्रमुख प्रथमेश गोवेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांचे भव्य स्वागत केले.
यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ (Former Education and Health Chairman), माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव (Former Social Welfare Chairman), माजी नगरसेवक गुरुदास मठकर (Former Councilor), सर्वेश मुळ्ये, दादा साळगांवकर, विजय इंगळे, प्रशांत राणे, समीर प्रभू गांवकर, प्रज्वल वर्दम, विनोद सावंत, संजय वरेरकर, सत्यवान बांदेकर, वसंत तांडेल, माजी सरपंच दीपक सावंत (Former Sarpanch), इन्सुली ग्रा.पं. सदस्य महेश धुरी (Gram Panchayat Member), वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, विकी केरकर, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस (Former Sarpanch), प्रवीण नाटेकर, बांदा ग्रा.पं. सदस्य मकरंद तोरसकर, अक्षय मयेकर यांसह अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्यात, भर मुसळधार पावसातही वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, मालवण तालुका (Talukas) तसेच बांदा दशक्रोशीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.












