घाणेखुंटमध्ये २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील घाणेखुंट येथे २३ वर्षीय तरुणीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अंगुरी खातून (रा. खान चाळ-घाणेखुंट, मूळगाव झारखंड) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
२० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तिला रक्तस्त्राव झाल्याने उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिला घरी पाठवण्यात आले. घरी गेल्यानंतर तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिकेने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता मृत घोषित केले.