रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहोळा

 

 

चिपळूण (प्रतिनिधी):--गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षीप्रमाणे रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे तालुकास्तरीय भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच मान्यवरांच्या व स्पर्धकांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पार पडला.

 

यावेळी दरवर्षीप्रमाणे नवदुर्गांचा सन्मानही करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे ग्रामदैवत कालभैरव सांस्कृतिक मंच अध्यक्ष विश्वास चितळे, अलोरे व्यापारी संघटना अध्यक्ष राजकिरण गुप्ता, ॲड नयना पवार, मराठी भाषा साहित्य कला संवर्धन मंडळ कोकण विभाग विश्वस्त अध्यक्ष संगीता लोटे, संजीवनी नर्सिंग कॉलेज संचालिका सौ हर्षा वागुळदे, आकार कॉलेज संस्थापक अध्यक्ष सौ. रोहिणी ओतारी, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष

सौ. अनुजा भोसले, सौ. मिनल गुरव, मयुरी काटकर यांची उपस्थिती होती.

 

 

या स्पर्धेत नव्वद स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहा उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. दोन विशेष पुरस्कार देण्यात आले. तर स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

गणपती सजावट प्रथम क्रमांक मंदार पंडव- पोफळी, द्वितीय क्रमांक मनीषा खेडेकर फणसवाडी, तृतीय क्रमांक साहिल उदेग धामणवणे, उत्तेजनार्थ मंगेश लांबे -वालोपे, संतोष पंडव -पोफळी, सुनिता महाडिक पेठमाप, विशेष पुरस्कार मंगेश भडवळकर- वैजी,

 

 

गौरी सजावट प्रथम क्रमांक राज राऊत -मोरेवाडी, द्वितीय क्रमांक अक्षय बामणे- पेठमाप, तृतीय क्रमांक प्रिन्सिका जाडकर, उत्तेजनार्थ रोहन चौधरी- खेंड, तुकाराम जाधव -कोंडफणसवणे, प्रतीक बैकर वैजी, विशेष पारितोषिक वंदेश चव्हाण या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

त्याच बरोबर कुटुंब समाज तसेच कुठल्याही परिस्थितीला निर्धाराने सामोरे जाणाऱ्या कर्तुत्वान महिला प्रमिला वरवाटकर- सावर्डे, साक्षी गावणंन -सावर्डे, भाग्यश्री शिंदे – शिरगाव, मीनल गांधी- खेंड, भारती विचारे- चिपळूण, अर्चना पोतदार- अलोरे, प्रिया सावंत-संगमेश्वर,श्रद्धा जाबरे – चिपळूण. अश्विनी गणपत्ये – चिपळूण, रमा करमरकर – चिपळूण, धनश्री गोखले यांचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी मनोहर पंडव, अंकुश आवले, राधा शिंदे, रहिमत जबले,हसीना राजीवटे, अनिता पवार, स्वाती भोजने, लता भोजने,प्राची जोशी आदी उपस्थित होते. फाउंडेशनच्या अध्यक्ष रंजिता ओतारी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण अजय यादव यांनी केले.

 

संस्थेचे पदाधिकारी दीप्ती सावंत देसाई, राणी महाडिक,सारिका पाटील, राधा फाळके ,नियाज सनगे,आश्रफ बेबल, मुजफ्फर चिपळूणकर, विशाल ओतारी, यश ओतारी आदींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.