खेड (प्रतिनिधी)शहरातील कोष्टीआळी येथील मोकळ्या जागेत असलेल्या एका गावठी हातभट्टी दारुधंदयावर धाड टाकून ३ हजार ,५०० रुपये किंमतीची ३५ लीटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली
, . हि कारवाई . १९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३:४० वाजता करण्यात आली असून खेड पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस शिपाई शबाना अस्लम मुल्ला यांनी फिर्याद दिल्यानुसार आरोपी प्रकाश हरिचंद्र जाधव (वय-५० वर्षे, रा. भरणे काळकाई मंदीरा शेजारील पवार यांची चाळ, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









