बांद्यात बेकायदा दारूसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

इन्सुली एक्साईजची कारवाई

बांदा: प्रतिनिधी : गोवा बनावटीच्या दारूची (Goa-made liquor) बेकायदा वाहतूक (illegal transportation) करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर (Bolero Tempo) राज्य उत्पादन शुल्कच्या (State Excise Department) इन्सुली पथकाने (Insuli Squad) बांदा येथे कारवाई (action) केली. सदरचा टेम्पो नवी मुंबई (Navi Mumbai) येथे घेऊन जात असल्याची कबुली (confession) चालकाने दिली. याप्रकरणी बोलेरो चालक (Bolero driver) वलेरियाने सेबीस्तीयनो ब्रगंजा (Valeriane Sebastiano Braganza) [रा. ऐरोली (Airoli)] याला ताब्यात (taken into custody) घेतले.

या कारवाईत १७ लाख १५ हजार ९०० रुपयांचा (worth ₹17,15,900) मुद्देमाल (material) ताब्यात घेतला. विधानसभा निवडणूक (Assembly election) काळात प्रथमच ही कारवाई बांदा सटमटवाडी (Banda Satmatwadi) येथे करण्यात आली. कारवाई झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी (Sindhudurg District Collector) अनिल पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक (Superintendent of State Excise) मनोज शेवरे, व मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) मकरंद देशमुख यांनी इन्सुली तपासणी नाका (Insuli Checkpoint) येथे भेट दिली. सदर कारवाई दुपारी (afternoon) करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर (background of the election) राज्य उत्पादन शुल्कचे इन्सुली पथक बांदा परिसरात तपासणी (inspection) साठी फिरत होते. दरम्यान (MH 43 BX 1154) बोलेरो टेम्पो आला असता, टेम्पो संशय आल्याने (due to suspicion) तपासणीसाठी थांबविला. गाडीची तपासणी (vehicle inspection) केली असता त्यात महागड्या ब्रँडची (expensive brand) दारू असल्याचे समोर आले. गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे ५० बॉक्स (50 boxes of Goa-made liquor) आढळून आले.

सदर कारवाई इन्सुली तपासणी नाका भरारी पथकाने (Insuli Checkpoint Flying Squad) केली. अधिक तपास (further investigation) दुय्यम निरीक्षक (Sub-inspector) प्रदीप रासकर करीत आहेत.